मुंबई : राज्यात पोलिसांच्या बदल्यांमध्ये किती भ्रष्ट्राचार आहे, हे उघड करणारा गोपनिय अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्या अहवालातील एजंट्सची नावंही समोर आली आहेत. तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगद्वारे राज्यातील पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट उघडकीस आणलं होतं. यासंदर्भातील अहवाल त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला होता. या अहवालात जवळपास अर्धा डझन एजंट्स आणि चाळीस एक अधिकाऱ्यांची नावं आहेत. पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट चालवणाऱ्या दलालांनी किती अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, यासंदर्भाती यादीच या अहवालात आहे. 


रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा अहवाल मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. हाच अहवाल देण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली असून यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. 


बदल्यांमधील भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार


देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं फडणवीस म्हणाले. तसेच बदल्यांचं रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकलं. सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले. उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.


रश्मी शुक्ला यांच्या चौकशीतून जे काही बाहेर पडलं ते धक्कादायक होतं : देवेंद्र फडणवीस 


कमिश्नर इन्टेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्यासंदर्भातील रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून तेव्हाचे डीसीएस होमची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्विलन्सवर लावले. त्या फोनमधून जे काही बाहेर पडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. म्हणून तो रिपोर्ट सादर झाला, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यावर कारवाई झालीच नाही, तत्कालीन कमिश्नर इन्टेलिजन्सवरच कारवाई झाली. त्यांना पदावरुन दूर करण्यात आलं. त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती, त्यातल्या अनेक लोकांना त्या-त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :