मुंबई : ‘एबीपी माझा’च्या तिसऱ्या नोटाबंदी सर्व्हेलाही नेटीझन्सनी भरघोस प्रतिसाद दिला. ‘माझा’च्या वेबसाईटवरील या पोलवर, हजारो वाचकांनी मत नोंदवलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाले आहेत. ही मुदत संपल्यानंतरची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘एबीपी माझा’ने या पोलच्या माध्यमातून केला.

यासाठीच सहा प्रश्नांच्या माध्यमातून ‘माझा’ने जनतेची मतं जाणून घेतली. त्या प्रश्नांचा सविस्तार आढावा –

1) 50 दिवसाच्या मुदतीनंतर नोटाबंदीचा हेतू साध्य झालाय असं वाटतं का?

होय - 58 %

नाही - 42 %

2) नोटाबंदीच्या 50 दिवसांमध्ये अपेक्षित काळा पैसा बाहेर आला असं वाटतं का?

होय - 51 %

नाही - 49 %

3) 50 दिवसांनंतरही सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या अडचणी कमी झाल्यात का?

होय - 54 %

नाही - 46%

4) कॅशलेस व्यवहारासाठी आपण पुरेसे तंत्रसज्ज आहोत का?

होय - 61%

नाही - 39%

5) नोटाबंदीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढला की घटला?

वाढला - 69 %

घटला - 31 %

6) नोटाबंदीचा फटका राजकारण्यांना बसला असं वाटतं?

होय - 59 %

नाही - 41 %


संंबंधित बातम्या
नोटाबंदीचा 1 महिना: एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हेचा निकाल

मुख्य सर्व्हे- नोटाबंदीचा 1 महिना: एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हे

पहिला सर्व्हे