Abhishek Ghosalkar Firing Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून (Firing) हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर मुंबई (Mumbai) हादरून गेली असतानाच, ठाकरे गटाच्या एका आमदाराने मोठा खळबळजनक दावा केला आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर, हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा याची देखील कोणीतरी हत्या केली असावी असं मला वाटतं. यात कुणीतरी तिसऱ्या माणसाचाही हात असावा अशी दाट शंका असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) देखील समोर आला आहे. तर, या घटनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे आणखीच वातावरण तापण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप...
याचवेळी बोलतांना देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) बाबत देखील मोठा दावा केला आहे. आपण जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत सुरतला गेलो, तेव्हा आपला 'गेम' करण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रचलं होतं. नितीन देशमुख यांनी अकोल्यात 'एबीपी माझा'शी बोलताना हा खळबळजनक आणि गंभीर आरोप केला आहे. याबाबतची माहिती शिंदे गटाच्या एका आमदारानेच आपल्याला दिल्याचा दावा सुद्धा नितीन देशमुख यांच्याकडून करण्यात आला आहे. सत्ता स्थापनेत आपला अडथळा होणार असल्याने आपला 'गेम' करण्याचा प्लॅन रचला गेल्याचा आमदार नितीन देशमुखांनी म्हटले आहेत. यातूनच आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या गेल्याचं सुद्धा आमदार देशमुख म्हणाले.
आम्ही मरणाला न घाबरणारी माणसं,
आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या गेल्यात. मुळात आपण सत्ता स्थापनेत अडचण ठरत असल्याने, आपला 'गेम' करण्याचा प्लॅन रचला गेला होता. विशेष म्हणजे हा सर्व प्लॅन फडणवीस यांनी रचला होता. याचा देवेंद्र फडणवीस यांनी देखील विचार करावा. अशा लोकांचा आम्ही वेळ आल्यावर हिशोब चुकता करू. आम्ही मरणाला न घाबरणारी माणसं, असल्याचे सुद्धा देशमुख म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :