कल्याण : राज्यात सुरू असलेल्या भोंगा आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa ) वादात आता आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party)  उडी घेतली आहे. सर्वच भोंग्यांचा निषेध करत सर्व जाती धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत 'आप'कडून चौकाचौकात वाजवले जाणार असल्याची माहिती आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवलीत आपच्या कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कले. महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडून त्यांना जगण्याच्या प्रश्नापासून दूर करण्याची भाजपसह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.  


कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या वतीने पक्ष बळकटीकरणासाठी आज कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दीपक सिंगल, गोव्याचे माजी उधोगमंत्री महादेव नाईक, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी धनंजय शिंदे यांनी महागाईवरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. 


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भोंगा व हनुमान चालीसा राजकारणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ऑगस्ट 2016 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणत्याही एका धर्माबद्दल न बोलता सर्व धार्मिक स्थळावरील धवनिक्षेपकाच्या आवाजाला 75 डेसीबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धिभेद करत आहे.  ग्रामीण भागातील मंदिरात सकाळी आरतीसाठी भोंगे लावले जातात. परंतु, महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडून त्यांना जगण्याच्या प्रश्नापासून दूर करण्याची भाजपासह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो."  


पेरोलवर सुटलेल्या पप्पू कलानीसोबत दोन कॅबिनेट मंत्री फोटो काढतात. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात असे सांगत ठाण्याचे पालकमंत्री पालक मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर शिंदे यांनी टीका केली. 


महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray: राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा; मनसेच्या या 'राज' नीतीची जोरदार चर्चा