विधानसभा निवडणुकीत बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना गुडन्यूज
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2016 06:18 PM (IST)
मुंबई: विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांना 1 महिन्याचं वेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यभरातील पोलिसांसाठीच्या एका महिन्याच्या वेतनासाठी 8 कोटी 96 लाख, तर मुंबई पोलिसांसाठी 1 कोटी रुपये देण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. निवडणूक काळात राज्यभरातील पोलिसांवर बंधोबस्ताचा प्रचंड ताण असतो. त्या प्रमाणात त्यांना कमी मोबदला मिळतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तामध्ये तैनात पोलिसांना 1 महिन्याचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.