हेडलाईन्स

: इंदापूरच्या तहसीलदार वर्षा लांडगेंवर हल्ल्याचा प्रयत्न, अनधिकृत वाळू वाहतूकदारांवर कारवाईदरम्यान घटना, वर्षा लांडगे थोडक्यात बचावल्या

-----------------------------

अमरावती : अनधिकृतरित्या पुतळ्याचं अनावरण प्रकरण, आमदार राणी राणांसह आठ जणांवर खेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

-----------------------------

1. दारु कंपन्यांचं पाणी तोडणं चुकीचं, पंकजा मुंडेंचं अजब तर्कट, तर काँग्रेसचं सरकारला पाच दिवसाचं अल्टिमेटम

 

2. देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आगीप्रकरणी आणखी चार जणांना अटक, अटकेत असलेल्या 13 पैकी 9 जणांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, लोखंडासाठी आग लावल्याचा आरोप

 

3. मुंबई-पुण्यात दुष्काळग्रस्तांसाठी राहण्या-खाण्याची सोय, नाम संस्थेचा स्तुत्य उपक्रम, स्थलांतरितांना पाहुण्यांप्रमाणे वागवण्याचं आवाहन

 

4. दिल्लीत मोक्याच्या ठिकाणी प्रियांका गांधींच्या घराला फक्त 31 हजार भाडं, माहिती अधिकारात उघड, जास्त घरभाडं देण्यास सक्षम नसल्याचा प्रियांकाकडून दावा

 

5. नरेंद्र मोदी महान व्यक्तीमत्व, 'फॅन' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखकडून मोदींचं कौतुक, असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुनही घुमजाव

 

6. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार, 5 जिल्ह्यातील 56 जागांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार

 

7. ठाण्यात 2 हजार कोटी रुपयांचं एफेड्रिन जप्त, 5 जणांना अटक, अंमली पदार्थांमधली सर्वात मोठी कारवाई

 

8. वसईत नक्षत्र ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून 4 किलो सोनं लुटलं, दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद

 

9. साताऱ्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, विहिरीतील पाणी वाटपाच्या वादातून भावाकडूनच भावाची हत्या

 

10. उत्तर-मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज तर चंद्रपुरात पारा 44.8 अंशांवर

 

एबीपी माझा वेब टीम