हेडलाईन्स:

 

1. माझ्यामुळेच भाजपचा मुख्यमंत्री, जळगावमध्ये एकनाथ खडसेंचं वक्तव्य, युती तुटली नसती तर सेनेचा मुख्यमंत्री झाला असता, खडसेंचं खळबळजनक विधान

---------------------------------

2. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, सेव्हन रेसकोर्समध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहांची बैठक, उत्तरप्रदेशला जास्त प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता

---------------------------------

3. सातव्या वेतन आयोगाला कॅबिनेटची मंजुरी, देशाच्या तिजोरीवर वर्षाला 1 लाख कोटी रुपयाचा बोजा, तर राज्य सरकारकडूनही हालचाली

---------------------------------

4. बँका, मॉल, हॉटेल्स, सिनेमागृहे 24 तास सुरू राहणार, मॉडेल शॉप अँड एस्टाब्लिशमेंट कायद्याला मंजुरी, नाईट लाईफला उधाण येणार

---------------------------------

5. शिवसेना आणि भाजपमधील दुराव्यात वाढ, उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार, भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

---------------------------------

6. ठाणे दरोडा प्रकरणाचा लवकरच होणार पर्दाफाश, पोलिसांना आरोपींचा सुगावा लागल्याची माहिती, बेड्या ठोकण्यासाठी पोलीस रवाना

---------------------------------

7. शेतीच्या वादातून शेजाऱ्यांनी तिघांचे कान कापले, बीडच्या खालापुरीमधली धक्कादायक घटना, आरोपींविरोधात अद्याप कारवाई नाही

---------------------------------

8. राज्य महिला आयोगाच्या सुनावणीला सलमान खानची गैरहजेरी, बलात्कार पीडीता वक्तव्याप्रकरणी बजावली होती नोटीस, माफी मागण्यास सलमानचा नकार

---------------------------------

9. ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांचं दीर्घ आजारानं निधन, पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास, आज अंत्यसंस्कार

---------------------------------

10. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून शास्त्री आणि गांगुलीत झालेला वाद आणखी चिघळला, शास्त्री मुर्खांच्या नंदनवनात जगत असल्याची दादाची टीका