हेडलाईन्स :


आजपासून राज्यभरात 12 वीची परीक्षा, यंदा 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांची कसोटी

--------------------

विविध मागण्यांसाठी देशभरातील 1 लाख 25 हजार बँका आज बंद, खासगीकरण आणि नोटाबंदीचा निषेध

-------------------

अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत, फडणवीसांवर दबाव वाढवण्याची खेळी, शिवसेनाही आक्रमक

------------

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपात संघर्ष, संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपसमोर मोठं आव्हान, तर काँग्रेस-मनसेची भूमिका शिवसेनेला दिलासा देणारी

------------

सैन्य भरतीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी 3 जणांना अटक, पुणे, नागपुरात कारवाई, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह दलालही जाळ्यात

--------------

29 वर्षानंतर ‘आयएनएस विराट’ सेवेतून निवृत्त,  मुंबईत नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जंगी निरोप, ‘विराट’चं संग्रहालय करण्याचा सल्ला