नवी दिल्ली : एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम फोन कॉलप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खडसेंचं समर्थन केलं आहे. केवळ खडसेंची बदनामी करण्याच्या हेतूने आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हे आरोप केल्याचं आंबेडकर म्हणाले.

 

तसंच इतर पाच फोन नंबरही 'आप'च्या प्रीती मेनन यांच्याकडे असतील. पण ते नंबर मेनन सादर का करत नाहीत, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. एखाद्यावर आरोप करुन बदनामी करण्याचा सपाटा सध्या सुरु असून ते योग्य नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नमूद केलं.

 

शिवाय सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन जनतेसमोर माहिती आणण्याची मागणीही  आंबेडकर यांनी केली आहे.

 

पाहा व्हिडीओ