LIVE : पिंपरी-चिंचवडमधील विजयानगर झोपडपट्टीला आग
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2016 01:42 AM (IST)
पिंपरी-चिंचवडमधील विजयानगर झोपडपट्टीला आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना, आगीचं कारण अस्पष्ट ------------------------- अमरावती : वडगाव माहुरी येथे पोहायला गेलेल्या आठ मुलांपैकी तिघांचा बुडून मृत्यू ------------------------- मनमाड-दाभाडीजवळ बाईक आणि कारचा भीषण अपघात,चार जणांचा मृत्यू तर चार जखमी, मालेगावच्या खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार ------------------------- 2020पर्यंत सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार,'एबीपी न्यूज'च्या मुलाखतीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची घोषणा ------------------------- नागपूर : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलिस कर्मचारी जखमी ------------------------- हेडलाईन्स: श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपण केंद्रातून भारतीय बनावटीच्या स्पेस शटल (आरएलव्ही-टीडी)चं यशस्वी उड्डाण ------------------------- 1. कुपवाड्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा सुपुत्र पांडुरंग गावडेंना वीरमरण, पांडुरंग गावडेंच्या पार्थिवावर आज आंबोलीत अंत्यसंस्कार ------------------------- 2. मणिपूरच्या चंदेलमध्ये अतिरेक्यांचा हल्ला, आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद, केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त ------------------------- 3. पोलिसांच्या अहवालावर शंका असतील तर खुशाल कोर्टात जा, खडसेंचं प्रीती मेननना आव्हान, कॉलिंग झालंच नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण ------------------------- ४. नीटच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्याआधी राष्ट्रपतींनी स्पष्टीकरण मागवलं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आज राष्ट्रपतींची भेट घेणार ------------------------- ५. जयललितांचा आज मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी, सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी होणार विराजमान, २८ कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा ------------------------- ६. इस्त्रोने बनवलेल्या भारतीय बनावटीच्या स्पेश शटलचं आज प्रक्षेपण, श्रीहरीकोटा येथुन होणार उड्डाण ------------------------- ७. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज निवड, संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची बैठक