या महिला टोळीची चोरी करण्याची खास पद्धतही समोर आली आहे. रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष जावू नये यासाठी चोरट्या महिलांनी शटरसमोर शाल आडवी धरली. त्यांच्या आडोशाला बसलेल्या दोन महिलांनी दुकानाचे शटर उचकवले. त्यानंतर एकीनं या दुकानात प्रवेश केला आणि 62 हजारांचा ऐवज लंपास केला.
महिला चोरट्यानं दुकानाच्या आत बॅटरी लावल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून आलं आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ: