हेडलाईन्स:


 

रत्नागिरीतील चिपळूण शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, अनेक भागात सोसाट्याचा वारा

 

नांदेड शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ

------------------------------

#दिल्ली : खडसेंसंदर्भातील अहवाल पक्षाध्यक्षांपुढे ठेवला असून, पुढची कारवाई ते निश्चित करतील - मुख्यमंत्री

------------------------------

#सोलापूर - शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना 1 रुपयात जेवण, कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम, उद्यापासून अंमलबजावणी

------------------------------

मुंबई : प्रसाद लाड विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता, पक्षातील नाराजी कमी करण्यासाठी भाजपचा प्रयत्न : सूत्र

------------------------------

#नवीदिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी भाजप मुख्यालयात दाखल, खडसेंबाबत निर्णय होण्याची शक्यता

------------------------------

मुंबई : कल्याण स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

------------------------------

नागपूर : कुलरचा शॉक लागून तिघांचा मृत्यू, मानकापूर परिसरातील घटना

------------------------------

भाजपच्या अंतर्गत विषयात शिवसेनेने लुडबूड करु नये, पत्रक काढून भाजपची तंबी

------------------------------

शिवसेनेच्या राजीनाम्याच्या मागणीवर काही बोलायचं नाही,जे बोलायचंय ते पक्षाध्यक्ष बोलतील: खडसे

 

राजीनामा द्या, निर्दोषत्व सिद्ध करा आणि सन्मानाने पदावर या : शिवसेनेचा खडसेंना सल्ला

 

भोसरी जमीन प्रकरण संशयाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं - : संजय राऊत

 

खडसेंनी जमीन खरेदी घोटाळा केला असेल, तर कायदेशीर कारवाई व्हावी - संजय राऊत


 



शिर्डीहून अहमदाबादला परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, खाजगी ट्रॅव्हल बस उलटल्यानं अपघात, 2 ठार 26 जखमी



--------------------------------------

 

1. एकनाथ खडसेप्रकरणी अण्णा हजारे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणार, अंजली दमानियांची माहिती, आजपासून दमानियांचं उपोषण

--------------------------------------

2. मुख्यमंत्री फडणवीस कौशल्य विकास बैठकीसाठी आज दिल्लीत, बैठकीत खडसेंच्या विषयावर चर्चा होते का? यावर असणार लक्ष

--------------------------------------

3. आशिष खेतान यांच्या तालावर सीबीआय काम करतं, सनातन संस्थेचा गंभीर आरोप, दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये साधकांच्या घरी सीबीआयचे छापे

--------------------------------------

4. संगमनेरमधील कौमार्य प्रकरणावर अखेर पडदा, पीडित मुलीची मुलासोबत नांदण्याची तयारी, जातपंचांना मुठमाती देण्याचाही निर्धार

--------------------------------------

5. गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाचा निकाल आज येण्याची शक्यता, नरेंद्र मोदींवर माजी काँग्रेस खासदाराच्या पत्नीचे गंभीर आरोप

--------------------------------------

6. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या चर्चेला उधाण,  सोनिया गांधींचं सूचक मौन, पक्षसंघटनेत मोठ्या बदलाचे संकेत

--------------------------------------

7. 3 वेळा तलाख शब्द उच्चारून घटस्फोट देण्याच्या पद्धतीविरोधात मुस्लिम एकवटले, 50 हजार मुस्लिमांची न्यायालयात जनहित याचिका, अनेक राज्यात स्वाक्षरी मोहिम

--------------------------------------

8. अभिनेते रझाक खान यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू, अनेक विनोदी भूमिका अविस्मरणीय

--------------------------------------

9. गुजरातच्या गीर जंगलात सिंहाचं अनोखं चित्र कॅमेऱ्यात कैद, एकाच वेळी पाणी पिण्यासाठी 8 सिंहाची फॅमिली ट्रीप

--------------------------------------
10. एबीपी माझाच्या वेबसाईटचा नवा विक्रम, महिन्याला तीन कोटी प्रेक्षकांची पसंती, जगभरातून विश्वासार्ह बातम्या आणि अपडेट्ससाठी माझावर शिक्कामोर्तब