LIVE : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव फुल्ल
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 02:05 AM (IST)
हेडलाईन्स : 1. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, तर विरोधक बागडेंविरोधात अविश्वास ठराव मांडणार -------------- 2. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावासाचं जोरदार कमबॅक, मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची हजेरी ------- 3. पंकजांना पाठिंबा देण्यासाठी भाजपची आर्मी मैदानात, पूरक पोषण आहारात कुठलाही घोटाळा नाही, कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पंकजांचा दावा ----------------- 4. एकनाथ खडसे आणि दाऊदमध्ये कुठलंही संभाषण नाही, एटीएसचा अहवाल, लाच प्रकरणानंतर खडसेंना आणखी एका प्रकरणात क्लीन चिट ----------------- 5. पंजाबमधील निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का, नवज्योतसिंह सिद्धूंचा भाजपला रामराम, आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता --------------------- 6. उत्तराखंडमध्ये पुराचा कहर, नैनितालमध्ये पर्यटकांची बस पाण्यात, एका महिलेचा मृत्यू इतर प्रवासी सुखरुप -------------------- 7. काश्मिर खोऱ्यातील हिंसाचार पाकिस्तानमुळे, राज्यसभेत राजनाथ सिंहांचा आरोप, 10 दिवसांपासून काश्मिरात कर्फ्यू ----------------------- 8. लोढा समितीनं केलेल्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारल्या; बीसीसीआयच्या प्रशासनात सहा महिन्यांत मोठ्या बदलांची शक्यता ---------- 9. ज्येष्ठ पार्श्वगायिका मुबारक बेगम यांचं वृद्धापकाळानं निधन, वयाच्या 80व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास ----------- 10. सलमान खानच्या सुलतान चित्रपटाची विक्रमी कमाई, 12 दिवसात 500 कोटींचा गल्ला, बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता