जळगावः कारमधून 54 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. व्यापारी अतुल कोठारी यांनी कार दुरुस्तीसाठी नेली असता, मागील सीटवरुन चोरट्यांची पैशांनी भरलेली बॅग लंपास केली.
जामनेरचे मका व्यापारी असलेल्या कोठारी यांनी व्यवसायासाठी बँकेतून 54 लाखाची रोकड काढली होती. रक्कम घेऊन जामनेरकडे परतत असताना त्यांची गाडी पंक्चर झाली. गाडीचा पंक्चर काढण्यासाठी ते थांबले असता ही घटना घडली.
कोठारी हे अजिंठा चौफुली येथे थांबले होते. यावेळी चोरट्यांनी कारच्या काचा फोडून मागील सीटवर ठेवलेली पैशांची बॅग लांबवली. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून परिसरातील सीसीटीव्हीचं फुटेजही तपासलं जातं आहे.