हेडलाईन्स :


शहीद जवान राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव कारवे गावात दाखल, राजेंद्र तुपारेंवर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार, कारवे गावावर शोककळा

---------------

शहीद राजेंद्र तुपारेंचं पार्थिव काही वेळात कारवे गावी पोहचणार, राजेंद्र तुपारेंवर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार, कारवे गावावर शोककळा

---------------

सांगलीच्या अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालयाची चौकशी, अॅडमिशनच्यावेळी बीएएमएसच्या विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दाखवल्याचं उघड

---------------

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान, हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प मैदानात, मतदानाकडे जगाचं लक्ष

---------------

राहुल गांधींनी पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी, राष्ट्रीय कार्यकारिणीत नेत्यांची आग्रही मागणी, सोनिया गांधींना भावना कळवणार

---------------

एनडीटीव्हीवरील एक दिवसाच्या बंदीला तात्पुरती स्थगिती, पीटीआयचं वृत्त, 9 तारखेला चॅनल बंद ठेवण्याचे आदेश तूर्तास मागे

---------------

दिल्लीनंतर महाराष्ट्राचाही श्वास गुदमरला, मुंबई, पुणे, नाशिक आणि चंद्रपुरात हवा प्रदूषित, माझाचा विशेष रिपोर्ट

---------------

बीडमध्ये कंकालेश्वर मंदिरावर नेत्रदिपक रोषणाई, ड्रोन कॅमेऱ्यात डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य, संस्कार भारतीचं आयोजन

---------------

दिल्लीतल्या तिबेट्टी मार्केटला भीषण आग, आगीत 130 हून अधिक दुकानं जळून खाक, मोठ्या प्रमाणात वित्तहानी