- 26/11 प्रमाणे बांगलादेशच्या ढाक्यात आयसिसचा हल्ला, 2 पोलिसांचा मृत्यू, 9 बंदुकधाऱ्यांकडून 30 जण ओलीस
------------------------
- मराठी मातीतल्या खऱ्या हिऱ्यांचा सन्मान. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा क्षेत्रातील 11 मान्यवरांचा गौरव. सुरेश प्रभू, फडणवीस आणि आमीरची उपस्थिती
------------------------
- युतीतील तणावावर औषधी वृक्षारोपणाचा उपाय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण तर उद्धव यांच्या हस्ते सुगंधी चाफ्याचं रोपण, दिवसभरात 2 कोटी 22 लाख वृक्षांची लागवड
-------------------------
- जून संपला तरी सांगली, सातारा, कोल्हापूरसह नाशिक कोरडंच, पाणी जपून वापरण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मुंबई आणि उपनगरात मात्र दमदार पाऊस
-------------------------
- उत्तराखंडात पुन्हा ढगफुटीचा कहर, अलकनंदेने धोक्याची पातळी ओलांडली, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू
-------------------------
- इंद्राणीनंच शीनाची गळा दाबून हत्या केली, माफीचा साक्षीदार झालेला ड्रायव्हर शाम रायचा कबुली जबाब, आरोपींना जबाबाची प्रत सोपवली
-------------------------
- अवघ्या 36 तासात ठाण्यातील 9 कोटीच्या दरोड्याचा छडा, नाशिकच्या वाडीवऱ्हे गावातील शेतातून 1 कोटी जप्त, कंपनीचे आजी-माजी कर्मचारीच मास्टरमाईंड
--------------------------
- भारतीय बनावटीचं फायटर प्लेन तेजस भारतीय वायुदलात सामील, बंगळुरुमध्ये धार्मिक विधींनंतर तेजसची गगनभरारी
-------------------------
- वेल्सची युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक, बेल्जियमचा 3-1 असा उडवला धुव्वा, उपांत्य फेरीत वेल्सचा पोर्तुगालशी मुकाबला
--------------------------