नागपूर : नागपुरात (Nagpur Crime News) 8 वर्षीय चिमुकल्या मुलीवर 20 रुपयाचे आमिष देऊन लहान बहिणीसमोर अत्याचार घडल्याची घडली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. निर्लज्ज, गद्दार मुख्यमंत्री सध्या सेलेब्रिटींसोबत फोटो काढण्यात व्यस्त आहेत, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घाणेरडं राजकारण करण्यात व्यस्त आहे. सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात असंवैधानिक, गद्दार मिंठे मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. सध्या ते सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यात मग्न आहे. फोटोमध्ये ते इतके व्यस्त आहेत की, त्यांनी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री हे घाणेरे राजकारण करण्यात व्यस्त आहेत.
काय आहे प्रकरण?
नागपुरात 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समोर आली आहे. अनोळखी आरोपीचे पोलिसांकडून स्केच तयार करत तपास सुरू आहे. नागपुरच्या आभा नगर परिसरात रविवारी दुपारी एका 8 वर्षांच्या मुलीवर चॉकलेट आणि पैशाचे आमिष देऊन अत्याचार करण्यात आले. 8 वर्षीय चिमुरडी आपल्या 4 वर्षीय बहिणीसोबत घरी होती. तर त्यांचे आई वडील मजुरी कामावर गेले होते. रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अंदाजे 40 वर्षीय इसमाने घरी वडील आहे का? अशी विचारणा केली. पीडित मुलीच्या काकाचं नाव घेत मी त्यांना ओळखतो अशी ओळख दाखवली. त्यानंतर छोट्या वर्षीय बहणीला बाहेर ठेवून आत जाऊन 8 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो फरार झाला.
आरोपीने मुलीच्या हातात वीस रुपये दिले अशी माहिती ही पोलीस तपासास समोर आली आहे. घटनेनंतर रात्री आई वडील आल्यावर मुलीने त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पारडी पोलिसात कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या आरोपीची ओळख पटत नसल्यानं पोलिस यंत्रणेद्वारे आरोपीचे एक स्केच तयार करण्यात आले आहे. तर बालकल्याण समितीचे अधिकारी दोन्ही बहिणी कडून जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान पीडित मुलीची प्रकृती ठीक असून तिला त्याच दिवशी वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.