मुंबई : एकीकडे आदित्यच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीत उतरत असताना, या ऐतिहासिक क्षणी मात्र आदित्यचे वडील म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच्यासोबत राहू शकले नाहीत. कारण, तिकडे 'मातोंश्री'वर उद्धव ठाकरे बंडोबांना थंड करण्यात आणि समजूत घालण्यात व्यस्त होते. जागांच्या अदलाबदलीसाठी अनेक इच्छुकांनी मातोश्रीवर ठाण मांडलंय. यासंदर्भात 'मातोंश्री'वर बोलवण्यात आलेली तातडीची बैठक नुकतीच संपली. मुंबईतले अनेक मतदारसंघ, तसंच करमाळा, वसमत आणि हिंगोलीमधल्या इच्छुकांना 'एबी फॉर्म' वाटण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वरळीतल्या शिवसेनेच्या सभेत आदित्यसोबत मातोश्री रश्मी ठाकरे तर होत्या, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपानं  'मातोंश्री'मात्र सोबत येऊ शकले नाहीत.


मी निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंची घोषणा, वरळीतून विधानसभेच्या मैदानात उतरणार

उद्धव ठाकरे मातोश्रीवर इच्छुकांची खदखद शांत करण्यात व्यस्त होते. जागांच्या अदलाबदलीसाठी अनेक इच्छुकांनी उशिरापर्यंत मातोश्रीवर ठाण मांडलं होतं. आणि यासंदर्भात मातोश्रीवर बोलवण्यात आलेली तातडीची बैठक नुकतीच संपलीय. मुंबईतले अनेक मतदारसंघ, तसंच करमाळा, वसमत आणि हिंगोलीमधल्या इच्छुकांना एबी फॉर्म वाटण्यात आलेलं नाही.

करमाळ्यामधून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांच्यासंदर्भात वेट अॅन्ड वाॅचची भूमिका घेतली आहे. सकाळपासून आलेल्या रश्मी बागल रिकाम्या हातानं परतल्या असून त्यांना उद्धव ठाकरेंनी उद्या परत येण्यास सांगितलं आहे. आमदार नारायण पाटलांना मातोश्रीवर येऊन रश्मी बागल यांना विरोध केला होता. तर वडाळातून श्रद्धा जाधव, वांद्रे पूर्वमधून तृप्ती सावंत, भांडूप पश्चिममधून अशोक पाटील, बेलापूरमधून विजय नाहटा, हतगांवमधून नागेश पाटील,  सोलापूर मध्यमधून दिलीप माने, हिंगोली जयप्रकाश मुंदडा यांच्याबाबत निर्णय होऊ शकला नाही.

शिवसेनेकडून 'या' नेत्यांची उमेदवारी ठरली, खुद्द उद्धव ठाकरेंनी दिले एबी फॉर्म

दरम्यान, आजपर्यंत शिवसेना आणि शिवसैनिकांनी सामान्य लोकांसाठी राजकारण आणि समाजकारण केलं. याच समाजकारणासाठी मी निवडणूक लढवणार  आहे, अशी घोषणा युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगितलं. वरळीमध्ये आयोजित शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. माझ्या विरोधात कुणीही लढू द्या. त्यांना अधिकार आहे. मात्र मला भीती नाही. माझ्यासाठी ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. ही मी घेतलेली  मोठी उडी आहे. मात्र मला चिंता नाही कारण आपण मला पडू देणार नाहीत, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी राजकारणात आलो असल्याचं यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले.

एबी फॉर्मचे वाटप झालेले उमेदवार (मुंबई सोडून राज्यातील इतर ठिकाणच्या इच्छुकांना एबी फॉर्म दिले आहेत.)

1. राजेश क्षीरसागर -
2. संग्राम कुपेकर - चंदगड (कोल्हापूर)
3. संदीपान भुमरे - पैठण
4. संजय शिरसाट - औरगाबाद पश्चिम
5. अर्जुन खोतकर - जालना
6. सुजित मिणचेकर - हातकणंगले (कोल्हापूर)
7. संतोष बांगर - हिंगोली
8. अजय चौधरी - शिवडी (मुंबई)
9. गौतम चाबुकस्वार - पिंपरी (पुणे)
10. उदय सामंत - रत्नागिरी
11. भास्कर जाधव - गुहागर
12. योगेश कदम - दापोली
13. राजन साळवी - राजापूर
14. अनिलराव बाबर - खानापूर-आटपाडी (सांगली)
15. अनिल कदम - निफाड (नाशिक)
16. योगेश घोलप - देवळाली (नाशिक)
17. राजाभाऊ वाजे - सिन्नर (नाशिक)
18. यामिनी जाधव - भायखळा (मुंबई)
19. दिलीप सोपल - बार्शी
20. शहाजी पाटील - सांगोला
21. विजय शिवतारे - पुरंदर

प्रकाश आबिटकर - राधानगरी

संजयबाबा घाटगे - कागल

निर्मला गावित - इगतपुरी

नितीन देशमुख - बाळापुर

रुपेश म्हात्रे - भिवंडी पूर्व

सुहास कांदे -नांदगाव

जयदत्त क्षीरसागर-  बीड

अब्दुल सत्तार -सिल्लोड

महेंद्र थोरवे -कर्जत

पांडुरंग बरोरा - शहापूर

ॲड. गौतम चाबुकस्वार -पिंपरी

विजय पाटील - वसई

प्रदीप शर्मा - नालासोपारा

समीर देशमुख - देवळी

संभाजी पवार- येवला

दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होणार?