Aaditya Thackeray Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज   महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेसाठी शिवसेनेचे  आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी ही  माहिती दिली आहे.  तर दुसरीकडे उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हंटल आहे.
 
ठाकरे कुटुंबीय भारत जोडो यामध्ये सहभागी होणार की नाही याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर आदित्य ठाकरे या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे.  आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेसाठी जाण्यासाठी उत्सुक देखील आहेत.  त्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे.  काल झालेल्या पत्रकार परिषदेत देखील उद्धव ठाकरेंनी शिवसेना यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती दिली होती. 


राज्यामध्ये सध्या भाजप, शिंदे गट, मनसे यांचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत असणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच इतर आमदार किंवा खासदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे.  काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली.  सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे अद्याप यात्रेत सहभागाबाबत ठरलं नसल्याची माहिती समोर आली आहे. भारत जोडोच्या माध्यमातून समाजाला  जोडण्याचे काम सुरु असून अनेक पक्षाचे नेते यामध्ये सहभागी  होत आहे. 


 पाच जिल्ह्यातून जाणार भारत जोडो यात्रा


राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14  दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. तामिळनाडूत द्रमुक नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काय? हे या यात्रेतून दिसून येईल. राहुल गांधी यांच्या यात्रेत आघाडीतले शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोन नेते सहभागी होणार की, नाही याची चर्चा सूरु आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या आजारी असलेले शरद पवार या यात्रेत सहभागी होणारं आहेत. दुसरीकडं ठाकरे पिता-पुत्रांनी मात्र, या यात्रेत सहभागी होण्याबाबतचा संस्पेन्स कायम ठेवला आहे.