औरंगाबादमध्ये भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 26 Jan 2018 11:49 PM (IST)
औरंगाबाद-पैठण रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात एक युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात एक युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. नाजिम शेख असं मृत युवकाचं नाव आहे. हा अपघात एवढा भयानक होता की दुचाकीवरील दोघे जण अक्षरश: हवेत फेकल्या गेले. या अपघातात नाजिमचा जागीच मृत्यू झाला. नाजिम आणि सलमान हे दोघे जण दुचाकीवरुन पैठणकडे निघाले होते. त्यावेळी राहुलनगर येथे दुचाकी आणि कारची समोरसमोर जोरदार धडक झाली. नाजिमच्या दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने त्याला समोरुन येणाऱ्या कारचा अजिबात अंदाज आला नाही. त्यामुळे कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.