Pune Bus Fire :  पुण्यात चालत्या खाजगी (pune fire) बसने पेट घेतला. यामध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते. खाजगी बस घोडेगाववरुन भीमाशंकरकडे जात होती. त्या दरम्यान ही घटला घडली आहे. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने थोडक्यात प्रवाशांचा जीव बचावला आहे. नाशिकमधील बसच्या आगीची घटना ताजी (fire) असताना पुण्याजवळ ही दुर्घटना (Pune Accident) घडली आहे. या बसमधील प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.


नाशिकमध्ये बस जळून बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. पुण्यात याची पुनरावृत्ती होता-होता टळली. भीमाशंकरला जाणारी मिनी बस जळून खाक झाली. सुदैवाने 27 भाविक सुखरुप आहेत. समोरुन येणाऱ्या एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने ही मोठी दुर्घटना टळली. 


भिवंडीहून भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी हे निघाले होते. बसमध्ये 23 महिला, 3 पुरुष असे 26 भाविक आणि चालक बसमध्ये होते. सकाळी साडे सहाच्या सुमारास घोडेगावच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर मिनीबस पोहोचली होती. त्यावेळी समोरुन खेड-राजगुरुनगरकडे निघालेल्या एसटी चालकाला बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे दिसून आले. एसटी चालकाने बसला थांबवून चालकाला याबाबत सूचित केलं. हे सगळं ऐकून चालकाने तातडीने बस थांबवली आणि सर्व भाविकांना गाडीतून उतरण्यास सांगितलं. सुदैवाने सगळे प्रवासी बसमधून उतरताच पुढच्या काही क्षणात मिनी बसने पेट घेतला आणि बघता-बघता बस जळून खाक झाली. यानिमित्ताने खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वेळेवर मेन्टेनन्स न केल्याने अशा घटना घडत असल्याचं बोललं जात आहे.


सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप
दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या भीषण आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. शिवाय अनेक प्रवाशी जखमी देखील झाले होते. ती घटना ताजी असताना पुन्हा एकदा खासगी बसने पेट घेतला आहे. या दुर्घटनेत मात्र चालकांच्या प्रसंगावधानामुळे 27 प्रवाशांचा जीव वाचला आहे आणि प्रवासी सुखरुप आहेत. 


खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मागील काही दिवसात खासगी बसच्या आगीच्या घटनेत वाढ झाल्याचं चित्र आहे. अनेक नागरीक सोयीसाठी खासजी बसने प्रवास करतात. जास्तीचे भाडे देऊन प्रवास सुखकर होण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र याच बसच्या दुर्घटनेत सध्या वाढ झाली आहे. खासगी बसचं जास्तीचं भाडं देऊनही प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र आहे. खासगी बस मालकांचं बसच्या मेन्टेनन्सकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचं वारंवार बोललं जात आहे. त्यामुळे खाजगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 


संबंधित बातम्या-


Nashik Bus Accident : नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, ट्रकचालकास अटक