तोंडात कांदा कोंबून पित्याकडून पोटच्या मुलीची हत्या
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 12 Jul 2016 05:09 AM (IST)
औरंगाबाद : बाराखडी येत नाही म्हणून एका पित्याने पोटच्या मुलीची हत्या केली. औरंगाबादच्या बाळापूर गावात घटना रविवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली आहे. भारती कुटे असं मृत मुलीचं नाव आहे. पहिलीत शिकणाऱ्या मुलीला बाराखडी येत नाही, म्हणून संतापलेल्या नराधम पित्याने मुलीच्या तोंडात कांदा कोंबून तिचा खून केला. त्यानंतर परस्परच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. परंतु मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर चिखलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजेश कुटेला खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली.