माळशेज घाट पुढील पाच दिवस बंद राहणार!

Continues below advertisement
कल्याण: माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या पाच दिवस माळशेज घाट बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही माळशेज मार्गे कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर तो रद्द करा.   काल सकाळी माळशेज घाटात दरड कोसळली त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना बघता माळशेज घाट पाच दिवस बंद ठेवला जाणार आहे. या काळात निसरड्या दरड हटवण्यात येतील. त्यानंतर मात्र मार्ग सुरळीत राहावा अशी अपेक्षा आहे.   दरम्यान, चार जुलैला देखील मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. जोरदार पावसामुळे माळशेज घाटात वारंवार दरडी कोसळण्याचा घटना घडत आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola