पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर 9/5 मधील रंग रसायन कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग आटोक्यात आली असून कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक ही आग लागून मोठे स्फोट झाले. आजूबाजूचा परिसरामध्ये या स्फोटांचे आवाज झाले.  गेल्या आठवडाभरामध्ये या औद्योगिक कार्यक्षेत्रातील दुसरी दुर्घटना असून संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ही आग लागली तेव्हा सुदैवाने कारखान्यात कोणतेही कामगार नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. सध्या आग विझवण्यात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे.  पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी बोईसर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कारखान्यात भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, एक बेपत्ता, पाच जखमी


4 सप्टेंबर रोजी बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील (Palghar Boisar Tarapur blast) जखारिया लिमिटेड या कापड निर्मिती करणाऱ्या कारखान्यात  भीषण स्फोट झाला होता. या घटनेत कारखान्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला होता एक कामगार अजूनही बेपत्ता होता. तर पाच कामगार जखमी झाले होते. 



या औद्योगिक कार्यक्षेत्रात सातत्याने असे मोठे अपघात घडत असून कुठेतरी सेफ्टी डिपार्टमेंट आणि संबंधित नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र समोर येत आहे. असे अपघात घडत असताना कामगारांचे नाहक जीव जात असून काही कामगारांना अपंगत्व ही येत आहे