मुंबई: भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात सुनावणी सुरू आहे. आज अॅड. प्रकाश आंबेडकर आपलं प्रतिज्ञापत्र सादर करु शकतात. सोबत इतर दोन साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे. तर दुसरीकडे सॅम डिसूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं दाखल केलेल्या कथित खंडणी वसुली प्रकरणात सॅम डिसुजा सहआरोपी आहे. हायकोर्टानं डिसूजाला अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. 


निलेश राणे यांच्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे 'जेल भरो' आंदोलन 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन येथे "जेलभरो" आंदोलन करण्यात येणार आहे. रिपोर्टर - निलेश
 
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबणार 


केरळात मान्सून दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दरवर्षी 7 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. मात्र आलेल्या बिपारजॉय चक्रीवादळामुळे बाष्प ओढल्या गेल्याने मान्सून महाराष्ट्र आणि मुंबईत कधी दाखल होणार याबाबत अनिश्चितता आहे. मात्र साधारण 15 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि 15 ते 17 जूनपर्यंत होत मुंबईत दाखल होऊ शकतो अशी माहिती आहे.
 
पुण्यातील पालखी मार्गाची मंत्री रविंद्र चव्हाण करणार पाहणी 


सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालखी मार्गाची सकाळी 11 वाजता, सासवड ते पंढरपूर रस्तेमार्गे पाहणी करणार आहेत. यावेळी ते पालखी थांबा आणि मुक्कामाच्या ठिकाणाचा आढावा घेणार आहेत. वारकऱ्यांसाठी असलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत. 
 
हिंगोली – संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथून निघणार असून या पालखीमध्ये जवळपास 200 वारकरी सहभागी होणार आहेत.
 
नाशिक ते पंढरपूर सायकल वारी


सायकल वारी आज नाशिकहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून यंदाचे त्यांचे हे अकरावे वर्ष आहे. आज सकाळी 6 वाजता गोविंदनगर परिसरात जवळपास तीनशे सायकलिस्ट एकत्र येऊन आरती करणार आणि त्यानंतर वारीला सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी पावणे दोनशे किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अहमदनगरला मुक्काम असणार आहे. 10 जूनला पंढरपूरला नाशिकसह राज्यभरातून जवळपास 4 हजार सायकलिस्ट एकत्र येणार असून 11 जूनला सकाळी प्रभात फेरी काढली जाईल आणि त्यानंतर विठूरायाचे दर्शन घेऊन रात्री सायकलिस्ट माघारी फिरतील. नाशिकचे सायकलिस्ट 200 झाडे सोबत घेऊन पंढरपूरला वृक्षारोपण करणार आहेत.
 
सोलापूर – नांदेड, लातूर आणि मुंबई येथे दलित अत्याचाचाराच्या घटना गेल्या काही दिवसापासून घडतायत. याच्याच निषेधार्थ अन्याय अत्याचार विरोधी कृती संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 
 
नाशिक – 


आरोग्य विज्ञान विद्यापीठचा रौप्य महोत्सवी दोन दिवसीय कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होणार आहे. आजच्या सत्रात किरण बेदी उपस्थित राहणार असून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


अहमदनगर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये आषाढी वारी नियोजन, तयारी आढावा बैठक होणार आहे.
 
जळगाव – आदिवासी एकता परिषदेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता भुसावळ येथे पत्रकार परिषदा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता फैजपूर येथे सभा होणार आहे.
 
धाराशिव – छोट्या छोट्या बाबी लक्षात घेवून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्यासाठी मोजदाद करण्याचे काम सूरू झाले आहे. दहा वर्षापासून हे काम झालेले नव्हते. आरबीआय सोने वितळवून घेईल. श्री तुळजाभवानी मंदीराकडे भाविकांनी दानपेटी आणि पावती माध्यमातून सुमारे 200 किलो सोने, चार हजार किलो चांदी अपर्ण केले असण्याची शक्यता आहे. हे सगळे ऐवज मोजण्यासाठी जवळपास एक महिनाभर लागेल.
 
नागपूर – नागपुरात आज छत्रपती शिवाजी महाराज सन्मान रॅली आयोजित करण्यात आलीये. विविध प्रकारच्या जाहिरातीमध्ये ब्रँड नेम म्हणून शिवाजी या नावाचा वापर होतो आणि त्यामुळे छत्रपतींच्या नावाचे हवे तसे सन्मान केला जात नाही. या मुद्द्याला धरून शिवभक्तांकडून संध्याकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सन्मान रॅली निघणार आहे.
 
बुलढाणा – राज्यात अतिवृष्टी ग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर पत्रकार परिषद घेणार आहेत.
 
अमरावती – अमरावती शहर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त जनसंपर्क अभियान कार्यक्रमाला आमदार नितेश राणे उपस्थित रहाणार आहेत. दुपारी 4 वाजता नांदगावपेठ येथे टेक्सटाइल पार्क याठिकाणी "विकास तिर्थ" कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या व्यापारी संमेलनात संबोधित करणार आहेत.
 
भंडारा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते दहावी, बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शक मिळावं, यासाठी स्पर्धा परीक्षा पुस्तिकेचं वितरण करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात या पुस्तिकेचे वितरण कार्यक्रम घेवून ते विद्यार्थ्यांना वितरण करण्याचा संकल्प केला असून सुमारे 20 हजार पुस्तक पटोले यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहेत.
 
आजच्या कोर्टातल्या सुनावणी



  • भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात सुनावणी सुरू आहे. आज अॅड. प्रकाश आंबेडकर आपलं प्रतिज्ञापत्र सादर करु शकतात. सोबत इतर दोन साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे. 

  • सॅम डिसूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं दाखल केलेल्या कथित खंडणी वसुली प्रकरणात सॅम डिसुजा सहआरोपी आहे. हायकोर्टानं डिसूजाला अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले होते.

  • खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेली अब्रू नुकसानीच्या याचिकेवर शिवडी कोर्टात आज सुनावणी. संजय राऊत यांनी सामना पेपरमध्ये बातमी छापून, मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयाचा शौचालय घोटाळा केल्या असल्याचा आरोप केला होता.

  • छगन भुजबळांनी येवला मतदारसंघातील 47 कोटी 50 लाखांच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. सत्ता बदल होताच या कामांना स्थगिती देण्यात आली होती. याविरोधात येवला स्थानिक आमदार छगन भुजबळ यांनी, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय याचिका. राज्य सरकारच्याबाजूनं माहिती देताना स्थगित देण्यात आलेल्या विकासकामांवरील स्थगिती उठवणार असल्याची ग्वाही देण्यात आली होती.
     
    राष्ट्रीय – 
     
    दिल्ली - भाजपाध्यक्ष जे पी नड्डांच्या अध्यक्षतेखाली भाजप केंद्रीय कार्यालयात महासचिवांची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक, दुपारी 4 वाजता.
     
    दिल्ली - लखनौ कोर्टात हत्या झालेल्या गँगस्टर संजीव जीवाची पत्नी पायल महेश्वरीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी.
     
    दिल्ली - बाईट टॅक्सी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, दिल्ली सरकार हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात, ओला, उबेर, रॅपिडो बाईक सर्विस बंद करण्याचे आदेश होते.
     
    दिल्ली - पटियाला हाऊस कोर्टात जंतर मंतरवर ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी.