मुंबई : परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे देशाच्या विकासात असलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी 9 जानेवारीला 'प्रवासी भारतीय दिवस' (Pravasi Bharatiya Divas) साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1915 साली महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आफ्रिकेतून भारतात परत आले होते. तसेच स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.आजच्या दिवसात इतिहासात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.  


1831: फातिमा शेख : भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका (Fatima Sheikh)


फातिमा शेख या सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यात झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा फातिमा शेख यांनीही त्यांना यात  साथ दिली. त्या काळात शिक्षक मिळणे कठीण होते. सावित्रीबाईंच्या शाळेत शिकवण्याची जबाबदारीही फातिमा शेख यांनी घेतली. यासाठी त्यांना समाजाच्या विरोधालाही सामोरे जावे लागले होते. 


1880: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा (Vasudev Balwant Phadke)



क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून 1880 साली आजच्याच दिवशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सुरूवातीच्‍या काळात फडके हे इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले होते. पण, मरणासन्न अवस्थेत असलेल्या आईला भेटण्यासाठी फडके यांना इंग्रज अधिकाऱ्याने रजा दिली नाही. आईचा स्वर्गवास झाला. त्‍यानंतर संतप्त झालेले फडके थांबले नाही. त्‍यांनी ब्रिटिश सरकारच्या धोरणांचा कठोर विरोध केला. 9 जानेवारी 1880 रोजी न्या. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली.


1965: दिग्दर्शक-कोरियोग्राफर फराह खान जन्मदिन (Farah Khan Birthday 2023)


दिग्दर्शक-कोरियोग्राफर फराह खान हिचा आज जन्मदिवस आहे. फराहने सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई येथून सोशिओलॉजी या विषयामध्ये पदवी संपादन केलेली आहे. फराहने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये शाहरूख खानपासून ते शाकिरापर्यंत अनेक अभिनेत्यांचा डान्स बसवला आहे. राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून फराह खान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि सिने दिग्दर्शिका म्हणून आज फराह खान लोकप्रिय आहे.


1974: बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर जन्मदिन (Farah Khan)


आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर याचा वाढदिवस आहे. फरहान अख्तर हा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि पटकथा लेखक हनी इराणी यांचा मुलगा आहे. जावेद अख्तर यांनी दोन विवाह केले आहेत. जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी असून फरहान हा त्यांचा मुलगा आहे. तो त्यांची दुसरी आई शबाना आझमी यांच्याही खूप जवळ आहे. फरहान अख्तरने 1991 मध्ये आलेल्या 'लम्हे' चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. मात्र त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 2001 मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटातून. फरहान अख्तरने 2008 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर फरहान भाग मिल्खा भाग, कार्तिक कॉलिंग कॉलिंग, लक बाय चान्स आणि द स्काय इज पिंक यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला.


1982: भारताचा पहिला शास्त्रज्ञ वर्ग अंटार्क्टिकाला पोहचला


9 जानेवारी 1982 रोजी पहिली भारतीय मोहीम टीम पृथ्वीच्या अगदी दक्षिणेला असलेल्या बर्फाळ अंटार्क्टिक खंडात पोहोचली. भारतासाठी ही मोठी कामगिरी होती. ही मोहीम 1981 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि टीममध्ये 21 सदस्य होते, ज्याचे नेतृत्व डॉ. एस.झेड. कासिम यांनी केले होते. तेव्हा कासिम हे पर्यावरण विभागाचे सचिव होते आणि त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे संचालकपद भूषवले होते. येथे वैज्ञानिक संशोधन करणे हे या मिशनचे उद्दिष्ट होते. संघाने 6 डिसेंबर 1981 रोजी गोव्यातून प्रवास सुरू केला आणि 21 फेब्रुवारी 1982 रोजी अंटार्क्टिकाहून गोव्यात परतला.


2007: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन लॉन्च केला (First Iphone Launch Date)


9 जानेवारी 2007 मध्ये स्टीव जॉब्स यांनी पहिला iPhone लॉन्च केला. हा फोन 3.5-इंच टच स्क्रीनसह सादर करण्यात आला होता. यात 3G सपोर्ट नेटवर्क सेवा होती. याचा  इंटरनेट सपोर्ट देखील 3G.06-Sept-2022 होता.


इतर महत्वाच्या घटना -


1790: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी याने मराठ्यांचा पराभव केला.
1788: कनेक्टिकट हे अमेरिकेचे 5वे राज्य बनले.
1913: अमेरिकेचे 37वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म.
1983: भारतीय अभिनेता शरद मल्होत्रा यांचा जन्म.
2000: भारताची प्रसिद्ध धावपटू हिमा दास हिचा जन्मदिन 
2002: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
2003: गीतकार व कवी कमर जलालाबादी यांची पुण्यतिथी