8th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयु तिरावर आरती करणार आहेत. आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि कोलकाता यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..


मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रामलल्लाचं दर्शन घेणार -


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आयोध्या दौऱ्यावर आहेत. ते रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयु तिरावर आरती करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही रामलल्लाच दर्शन घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली. 


राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर... 


आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. 


- बीड : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यातही नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळी पावसामुळे औरंगाबाद, हिंगोली,परभणी आणि बीडमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय... मराठवड्यात 54 जनावराचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरू आहे...


- पंढरपूर - पावसाच्या दणक्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत... शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अटी शिथिल केल्याचे सांगत असले तरी बेदाणे करणाऱ्या शेतकऱ्यांची यापेक्षा वाईट आहे... 1 किलो बेदाणा बनवायला 70 ते 80 रुपये खर्च येत असताना दोन दिवसांच्या अवकाळीमुळे दर 50 रुपये पर्यंत घसरले आहेत... शासनाच्या नियमानुसार 5 दिवस रोज किमान 10 मिलिमीटर पाऊस पडला तर नुकसान भरपाई मिळते, मात्र बेदाण्याला पाऊस न पडता नुसत्या ढगाळ हवामानाचाही फटका बसून 200 रुपयांचे भाव चार पटीने कमी होत आहेत. 


शिर्डी-शेगावात  भक्तांची मोठी गर्दी -


शिर्डी/शेगाव – सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी...  शिर्डी, शेगाव, पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी... शिर्डीच्या साई मंदिराच्या, शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनरांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं चित्र आहे... आज रविवार असल्यानं अनेक भाविक दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी करण्याची शक्यता आहे.


- बुलढाणा - दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राज्यभरातून भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे... सलग आलेल्या तीन ते चार दिवसांच्या सुट्टीमुळे राज्यभरातील भाविक वेगवेगळ्या मार्गाने शेगाव दाखल होत आहे आणि त्यामुळे दररोज शेगावत एक ते दीड लाख भाविक संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेत आहेत... यामुळे शेगावात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे... (सकाळी 7.30 वाजता डॉ. संजय महाजन लाईव्ह)


पुणे - खासदार सुप्रिया सुळे या मुळशी तालुक्यातील अम्रिता विद्यालय या शाळेचे उद्घाटन सकाळी करणार आहेत. 


पुणे - भाजपकडून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन.  डेक्कन भागातील सावरकर स्मारकापासून सुरुवात. 


सातारा - विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सातारा जिल्हा दौरा... सकाळी 9.30 वाजता जिल्हा बँकेमध्ये ज्येष्ठ उद्योजक श्रीधर कंग्राळकर यांच्या वडिलांच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे त्यासाठी अजित पवारांची उपस्थिती... कंग्राळकर हे अजित पवारांचे मावसभाऊ आहेत... सकाळी 1130 वाजता मराठा बिझनेस यांचा वाढे फाटा या ठिकाणी आहे..  दुपारी 3.30  वाजता मेढा येथे शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश असा कार्यक्रम आहे.  भाजपचे सक्रिय कार्यकर्ते अमित कदम हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. अमित कदम हे माजी आमदार जी.जी. कदम यांचे सुपुत्र आहेत


नाशिक - शरद पवार नाशिक मुक्कामी आहेत… सकाळी देवरगाव इथे आश्रम शाळा हॉस्टेल आणि शाळा इमारत भूमिपूजन सोहळा होणार आहे... दुपारी दोन पर्यंत नाशिकमध्ये आहेत, त्यानंतर पुण्याला जाणार आहेत. 


बैलगाडी शर्यत -


सांगली - भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आज विटा जवळील भाळवणी येथे घेत आहेत.. या  बैलगाडी शर्यतीसाठी आतापर्यंत कधीही न देण्यात आलेली भव्य अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.. अगदी थार गाडीपासून ते ट्रॅक्टर ते दुचाकीपर्यत या  बैलगाडी शर्यतीसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दिवसभर या स्पर्धा पार पडणार असून साधारण 5 वाजण्याच्या सुमारास या शर्यतीचे अंतिम शर्यती पार पडतील आणि बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडेल. या बक्षीस वितरणासाठी माजी मंत्री जयंत पाटील, श्रीनिवास पाटील, विश्वजित कदम, निलेश लंके, असे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी होणार आहेत


मिरजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेस सुरुवात झाली असून संपूर्ण भारतातून १५० हुन अधिक पुरुष व महिला शरीर सौष्ठवपटू सहभागी  झालेत. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडणार आहे. स्पर्धेत जिंकणाऱ्या विजेत्यांकरिता ६ लाखाहून अधिकचे रोख पारितोषिक आणि इतर आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. या सर्व शरीरपपटू मधून "भारत सर्वश्रेष्ठ हा किताब विजेत्यास देण्यात येईल त्या व्यतिरिक्त ७ विविध किताब विजेत्यांस देण्यात येतील.


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबाबत लाभार्थ्यांशी व बँक अधिकाऱ्यांशी संवाद मेळावा सकाळी 10 वाजता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अन्य पार पडणार आहे. 


मुंबई - मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेशचा सायंकाळी 5 वाजता सोमय्या मैदानात महामेळावा अयोजित करण्यात आला आहे... या मेळाव्यास मुंबईतील बंजारा समाज हजारोंच्या संख्येने सामील होणार असल्याची घोषणा बंजारा आघाडीचे राज्य अध्यक्ष सोमु उर्फ कामु पवार यांनी केली. मुंबईत बंजारा भवन निर्माण करण्याची बंजारा समाजाची मागणी असून याची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून मुंबईत बंजारा भवन उभारण्यात यावे, मानखुर्द येथील सायन ट्रॉम्बे रोडवरील ट्रॉम्बे उड्डानपुलास संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी बंजारा समाजाची मागणी आहे. तसेच बंजारा समाजाला स्वंतत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देण्यात यावे या बंजारा समाजाच्या मागण्या आहेत.


9th April Headlines :


मुंबई - टीजेएसबी सहकारी बँक पाच राज्यातून १३६ शाखांद्वारे कार्यरत आहे. टीजेएसबी सहकारी बँक देशातील आघाडीची नागरी सहकारी बँक आहे. मल्टीस्टेट शेड्युल्ड, टीजेएस्‌बी सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ च्या लेखापरिक्षित आर्थिक निकालांची माहिती देण्यासाठी टिपटॉप प्लाझा तीन हात नाका ठाणे या ठिकाणी सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलयं.


पुणे - पुण्यात रविवारी व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आलयं... स्कुटर आणि मोटर सायकल देखील सहभागी होणार.  सकाळी नऊ वाजता गोळीबार मैदानापासून या रॅलीला सुरुवात होईल आणि 15 किलोमीटरचे अंतर कापून ही रॅली टर्फ क्लब येथे संपेल. 


पुणे - श्री जैन सामुदायिक उत्सव समितीकडून आयोजित जिन महावीर ज्ञान विज्ञान पुरस्कार प्रदान सोहळा सकाळी 10.30 वाजता. पृथ्वीराज चव्हाण, तुषार गांधी उपस्थित राहणार. 


सिंधुदुर्ग - राज्यातील पहिलं समुद्र किनाऱ्यावर पहिला पॅरामोटर राइड देवभूमी अर्थात देवबाग मध्ये सुरू झालं आहे. पर्यटन सुरू झाल असून पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आकाशात पक्षाप्रमाणे विहार करण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत.


नागपूर - 16 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची नागपूरात जाहीर सभा होत असून महाविकास आघाडीने त्यासाठी नंदनवन परिसरातील दर्शन कॉलनीचे मैदान निश्चित केले आहे... भाजपचे स्थानिक आमदार तसेच काही स्थानिक नागरिकांनी मात्र या मैदानावर राजकीय सभा घेण्यास विरोध दर्शविला आहे... दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि खास करून काँग्रेसचे नेते दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहे... त्यामुळे सभा स्थानाचा हा वाद कोणत्या दिशेला जाईल... भाजप आमदार आणि स्थानिक नागरिकांचा विरोध मावळेल का ?? याकडे पहाव लागेल


नागपूर - दिव्यांग आणि विमनस्क मुलांच्या पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनासाठी आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नागपूरला येणार आहे... नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील जुनेवानी गावाजवळ दिव्यांग आणि विमनस्क मुलांसाठी "इन्स्पायर" हे पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे... डॉ विराज शिंगाडे यांनी हे पुनर्वसन केंद्र उभारले असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे....


गोंदिया - काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार गोंदिया जिल्हा दौऱ्यावर... महाविकास आघाडीची सभा होणार आहे, त्यासंदर्भात ते माहीती देणार आहेत. तसेच देशामध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात ते पत्रकारांशी संवाद साधतील


भंडारा - नागपूर इथं महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे त्याअनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद. माजी राज्यमंत्री आमदार विजय वड्डेटीवार, आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू कारेमोरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नरेश डहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले आहे. 


वाशिम - शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व युवकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने जिल्ह्यातील तरुण तरुणी नोकरीची संधी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित असणार  आहेत.


नांदेड - माहूरला आज नव्याने स्थापन झालेल्या बंजारा समाजाच्या समनक पक्षाची पहिली सभा आहे... 


आयपीएलमध्ये डबल हेडर - 


रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने आहेत.  दुपारी गुजरात आणि कोलकाता यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर संध्याकाळी हैदराबाद आणि पंजाब यांच्यामध्ये काटें की टक्कर आहे. गुजरात आणि कोलकाता विजयी लय कायम राखण्यासाठी आमनेसामने येतील... तर हैदराबाद पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल.