1. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, केंद्र सरकारची अधिसूचना जारी, कायद्याविरोधातल्या आंदोलनानंतरही केंद्र सरकार ठाम

    2. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत घोषणा, इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी येत नसल्याचीही खंत

    3. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, तर परळीत धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी 700 किलोचा हार आणि आतषबाजी

    4. साहित्य संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची अप्रत्यक्ष हिटलरशी तुलना, जेएनयू हिंसाचार आणि बेरोजगारीवरुन खडेबोल

    5. उद्यापासून गायी, म्हशीचं दूध दोन रुपयांनी महागणार, पावडर दूध आणि दूध खरेदी दर वाढल्यानं दूध संघांचा निर्णय






  1. शक्तीप्रदर्शनासाठी दोन्ही ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त, 23 जानेवारीला सेनेचा वचनपूर्ती मेळावा, तर विधानसभेनंतर मनसेचं पहिलं अधिवेशन

  2. जेएनयू हिंसाचारामागे डाव्या विद्यार्थी संघटनेचा हात, दिल्ली पोलीस आणि जावडेकरांचा आरोप, तर आरोप फेटाळून लावताना आयेशी घोषचे पोलिसांना प्रत्युत्तर

  3. काश्मिरातील इंटरनेट बंदीवरुन केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी,  प्रशासनानं सर्व आदेशांची समीक्षा करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

  4. मराठीद्वेषापोटी कन्नडिंचा बेळगावात तान्हाजी चित्रपटाला विरोध, ग्लोब सिनेमागृहातले तान्हाजी चित्रपटाचे पोस्टर्स उतरवले

  5. टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 78 धावांनी धुव्वा, 2-0 ने मालिका विजय, भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या खेळाडूंचं लोटांगण