टँकर आणि क्रूझरचा भीषण अपघात, बेळगावात नऊ तरुणांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2019 11:30 AM (IST)
होळीनिमित्त तरुणांचा ग्रुप गोव्याला गेला होता. होळी साजरी केल्यानंतर गोव्याहून गावाकडे परतत असताना हा अपघात घडला.
बेळगाव : होळीचं सेलिब्रेशन करुन परतत असताना बेळगावमध्ये टँकर आणि क्रूझरच्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. विजापूरजवळील सिंदगी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे. सर्व मृत हे तरुण असून कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापुरचे रहिवासी आहेत. होळीनिमित्त तरुणांचा ग्रुप गोव्याला गेला होता. होळी साजरी केल्यानंतर गोव्याहून गावाकडे परतत असताना हा अपघात घडला. क्रूझर चालकाच्या अतिवेगामुळे आणि डुलकीमुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातात पाच जण जखमी असून त्यापैकी तिघांची तब्येत चिंताजनक आहे.