सातारा : डॉक्टर जर सातवी, आठवी आणि नववी पास असतील तर? पण हे प्रत्यक्षात घडलंय सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात. दुर्गम भागातील शेळ्या-मेंढ्यांना उपचार देण्यासाठी खास प्रशिक्षण घेऊन सात महिला डॉक्टर झाल्या आणि किरकोळ उपचारापासून ते कृत्रिम रेतन करण्यापर्यंत काम करतात.


सातवी, आठवी, नववी पास महिला आणि त्याही डॉक्टर. हे ऐकताना तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना? पण प्रत्यक्षात या सात महिला दुर्गम भागातील लोकांसाठी झाल्या डॉक्टर आहेत. गोट डॉक्टर म्हणजेच शेळ्यांचे  डॉक्टर. गेल्या 2 वर्षांपासून या महिला या महिला गावा गावातील शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर उपचार करत आहेत.

सातारा जिल्ह्यातील  माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून शेळ्यांवर उपचार करण्यासा सात महिलांची निवड करण्यात आली आणि त्यांना फलटण येथील निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टट्यूट यांच्या मार्फत प्रशिक्षण दिल गेलं. ज्या गावात गाडीची सोय नाही, अती दुर्गम भाग अती दुष्काळी भाग अशा अनेक गावात जाऊन त्या पीडित शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर या सात महिला उपचार करतात. तसेच कृत्रिम रेतनही करतात.

गेल्या 2 वर्षात 3 हजार पेक्षा जास्त शेळ्यांवर सीमेन देणे आणि 5 हजार पेक्षा जास्त इतर जनावरांवर योग्य असे उपचार करुन त्यांना बरे केले आहे. दुर्गम भागात काम करताना या महिलांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकांनी त्यांना नावेही ठेवली. मात्र, त्यांनी आपली जिद्द कायम ठेवत गावामध्ये जाऊन काम करायला सुरुवात केली आणि अखेर या सात महिला गावा गावात गोट डॉक्टर म्हणुन उदयाला आल्या आणि आता या सर्व महिलांना संपुर्ण गावच्या गाव डॉक्टर म्हणुनच ओळखतात.

म्हसवड येथील माणदेश फाऊंडेशनच्या मुख्य कार्यालयामध्ये या डॉक्टर महिलांसाठी एक वेगळा विभाग करण्यात आला आहे. शेळी पालन करणारे व्यावसायिक हे या विभागात फोन करतात. मग या महिला डॉक्टरांचे काम सुरु होते. शेळ्यांचा उपचारांसाठी आणि त्यांना सीमेन देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतले जातात. एका मोटार सायकलवर

बसून या महिला डॉक्टर ज्या व्यावसायिकाने संपर्क केला, त्या गावात पोहचतात. आजपर्यंत केलेल्या कृत्रिम रेतनमध्ये तब्बल 70 टक्केच्या वरती यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यांचा चांगलाच फायदा झाला आहे.

Video : स्पेशल रिपोर्ट :