हिंगोली : जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये तब्बल 60 साप आढळून आल्याची खळबळजनक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात घडली. पांगरा बोखारे येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. मात्र शिक्षक आणि ग्रामस्थांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना बोलावलं आणि घोणस जातीच्या सापासह 60 पिल्लांना पकडलं.
पांगारा बोखारे येथील जिल्हा परिषद शाळेत 12 जुलै रोजी सकाळी विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचं सामान काढलं जात होतं. शाळेच्या किचनमध्ये स्वयंपाकाचं सामान काढत असताना सामानाखाली सापाचं एक पिल्लू मदतनीसांना दिसलं. त्यापाठोपाठ तीन, चार पिल्लं बाहेर येत होते. सामान उचलून पाहिलं असता चार फूट लांब साप आणि 60 पिल्ले आढळून आले.
या घटनेनंतर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण. काहींना साप मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्याध्यापक त्र्यंबक भोसले आणि भिमराव बोखारे यांच्यासह काही ग्रामस्थांनी पुढाकार घेत साप न मारण्याचा निर्णय घेतला.
वसमत येथील सर्पमित्र विक्की दयाळ आणि त्यांचा सहकारी बाळासाहेब भालेराव यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावण्यात आलं. तोपर्यंत सापांनी बनवलेले घर पाहण्यासाठी संपूर्ण गाव जिल्हा परिषद शाळेत पोहोचलं होतं. सर्पमित्रांनी दोन तास परिश्रम घेत साप बाटलीबंद केले आणि त्यांना जंगलात नेऊन सोडलं.
ग्रामस्थांच्यावतीने मुख्याध्यापक टी. डी. भोसले यांच्या हस्ते सर्पमित्रांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
झेडपी शाळेचं किचन उघडलं आणि समोर 60 साप!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2018 06:44 PM (IST)
पांगरा बोखारे येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. मात्र शिक्षक आणि ग्रामस्थांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना बोलावलं आणि घोणस जातीच्या सापासह 60 पिल्लांना पकडलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -