साताराः साताऱ्यातल्या मंगला जेधेंची हत्या केल्याची कबुली देणारा आणि तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. संतोष पोळने एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. यात 5 महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

 

मंगला जेधे हत्याप्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व हत्या डॉ. पोळ याने आपल्या फार्म हाऊसवर बोलावून केल्याचंही कबूल केलं आहे. मंगल जेधे यांच्या हत्येची तर कबुली दिली आहे, मात्र इतर 5 जण कोण आहेत, याची माहिती मात्र अजूनही समोर आलेली नाही.

 

मंगला जेधे या 16 जूनपासून साताऱ्यातून बेपत्ता होत्या. बेपत्ता होण्याआधी मंगला जेधे आणि संतोष पोळ यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. तेव्हापासून डॉ. पोळ बेपत्ता होता. पण एका नर्सची चौकशी केल्यानंतर संतोष पोळचा सुगावा लागला आणि मुंबईतील दादरमध्ये पोलिसांनी संतोष पोळच्या मुसक्या आवळल्या.

 

या 6 जणांची केली हत्या

 

हत्या करण्यात आलेले 4 मृतदेह संतोष पोळच्या फार्म हाऊसमध्येच सापडले असून आणखी एक मृतदेह उकरून काढण्याचं काम सुरु आहे. मंगला जेधे,सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड या 6 जणांची पोळने हत्या केली आहे. पण सहावा मृतदेह हा धोम धरणात फेकून देण्यात आल्याचंही कळतंय. संतोष पोळची अटक आणि त्याच्या धक्कादायक हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे.