अहमदनगर: थंडीच्या शर्यतीत यंदा अहमदनगरनं नाशिक, पुणे आणि नागपूरलाही मागे टाकल्याचं दिसतं आहे. अहमदनगरमध्ये 6.7 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.


यंदाच्या मोसमातलं हे राज्यातलं कमी तापमान असल्याचं समजतं आहे. तर नागपूरमध्ये पारा 8.1 तर नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सियपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळं इथले रहिवासी स्वेटर किंवा तत्सम कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत.

अनेक ठिकाणी चांगली थंडी जाणवत असल्यानं अनेकजण थंडी एन्जॉय करण्यासाठी शेकोटी आणि वावरातल्या हुर्डा पार्टीचा बेत आखत आहेत. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर पाहायला मिळत आहे.