नागपूर : नागपुरात आज भर दुपारी वर्दळीच्या रस्तावर सव्वा सहा लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. कस्तूरचंद पार्क जवळच्या बीएसएनएल ऑफिसच्या समोर हा प्रकार घडला.


नागपूरच्या कस्तूरचंद पार्कजवळच्या मार्गावरुन एका तंबाखू व्यापाऱ्याचा कर्मचारी बॅगेत 6 लाख 25 हजारांची रक्कम घेऊन बँकेत चालला होता. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी, कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकली. आणि त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला.

दरम्यान, नागपूरमधील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

पण त्यावरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील नरेंद्रनगर भागात दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तब्बल सात बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

नागपूर पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजनेला चोरट्यांचा ठेंगा