निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
नवी मुंबईत बिल्डरच्या अंगावरील 55 तोळे सोनं लुटलं
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 26 Dec 2016 03:18 PM (IST)

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे येथे एका बिल्डरच्या अंगावरील 55 तोळे सोनं आणि 65 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चैन, साखळी, ब्रेसलेट अशा दागिन्यांचा समावेश आहे. घर बूक करण्याच्या बहाण्याने तीन जण सुनील पाटील यांच्या कामोठे येथील कार्यालयात शिरले. आत शिरल्यानंतर चोरट्यांनी सुनील पाटील यांच्यावर अंगावरील 55 तोळे सोनं आणि कार्यालयातील 65 हजार रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान कामोठेसारख्या सतत गजबजलेल्या नागरी वस्तीत भर दिवसा एवढी मोठी लूट झाल्याने भीतीचं वातावरण आहे.