बीड : बीड शहरामध्ये एकाच मांडवाखाली तब्बल 501 मुलींच्या बारशाचा कार्यक्रम पार पडला. बीड जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खटोड प्रतिष्ठानकडून हा अनोखा उपक्रम राबवला गेला. या कार्यक्रमात 501 मुलींची नामकरण सोहळा पार पडला. बीडच्या खासदार प्रितम मुंडे या बारशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे एकीकडे मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमाची गाणी म्हटली जात होती तर दुसरीकडे खासदार बाळांना कडेवर घेत झुलवत होत्या.
मागील पंधरा वर्षापासून बीड शहरात स्व. झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय किर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षी खटोड प्रतिष्ठानकडून नुकत्याच जन्मलेल्या मुलींचं नामकरण सोहळा भरवण्यात अला. यावेळी बाळांच्या आईंना फेटे बांधण्यात आले होते. तर बाळांच्या हातात खेळणी आणि मातांच्या हातात पाळण्याची दोरी होती. पाळण्यांना छान सजवण्यात आले होते.
बीड जिल्ह्यात मुलांमागे मुलींचं जन्माचं प्रमाण खूप कमी आहे. मात्र गेल्या काही काळात जनजागृतीच्या कार्यक्रमामुळे हा जन्मदर वाढला आहे. तरी अजूनही मुलींचं जन्मदर मुलांच्या तुलनेत कमीच आहे. हाच जन्मदर वाढवण्यासाठी खटोड प्रतिष्ठान आणि जिल्हा रुग्णालयानं हे पाऊल उचललं आहे. यासाठी जनजागृती मोहीमही राबवण्यात येत आहे.
स्त्रीभ्रूण हत्यांनी कलंकित झालेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर झपाट्याने वाढू लागला आहे. म्हणूनच जिथं मुलींच्या जन्माचं इतक्या धूम धडाक्यात स्वागत केलं जातं हेच महिला सक्षमीकरणांच्या दृष्टीने पाहिलं पाऊल म्हणावे लागेल.
बीडमध्ये एकाच मंडपाखाली 501 मुलींचं बारसं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jan 2019 05:55 PM (IST)
या कार्यक्रमात 501 मुलींची नामकरण सोहळा पार पडला. बीडच्या खासदार प्रितम मुंडे या बारशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे एकीकडे मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमाची गाणी म्हटली जात होती तर दुसरीकडे खासदार बाळांना कडेवर घेत झुलवत होत्या
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -