भोकरदन : भोकरदन-सिल्लोड रस्त्याजवळील मुठाड पाटीजवळ ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबादमधील फुलंब्री येथील चौघांचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले.


मैनाजी पिराजी बनसोडे (वय 65 वर्षे), त्यांचा मुलगा संजय मैनाजी बनसोडे (वय 32 वर्षे), नातू श्रेयस संजय बनसोडे (वय 5 वर्षे) आणि भालचंद्र कचरू वाघ (वय 36 वर्षे) यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. तर अनीता संजय बनसोडे (वय 27 वर्षे), ऋतुजा संजय बनसोडे (वय 11 वर्षे) , रामचंद्र उमाजी मोरे, जयश्री रामचंद्र मोरे, यश संजय बनसोडे  हे गंभीर जख्मी झाले आहेत.

जखमींना उपचारसाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, हे सर्व जण चांडोळ जिल्हा बुलढाणा येथून लग्नकार्य उरकून घरी परतत असताना हा अपघात घडला ,अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.