अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2017 12:30 PM (IST)
अहमदनगर : अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपी भगवान वाघमारेला पोलिसांनी अटक केली आहे. काल शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पाथर्डीतील वडगावमध्ये शनिवारी संध्याकाळी ही चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी 63 वर्षीय भगवान वाघमारे यानं मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपी भगवान वाघमारे विरोधात 376 आणि 452 कलमाअंतर्गत पोक्सा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. कोपर्डीतील तरुणीवर अत्याचारांनंतर राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पाथर्डीमध्ये पुन्हा 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानं नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.