मुंबई : राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 5 जून रोजीच 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
  1. मिलिंद म्हैसकर
सध्या : मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव नवी नियुक्ती : मुंबई 'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
  1. डी. बी. गावडे
सध्या : अहमदनगर महापालिकेचे आयुक्त नवी नियुक्ती : आदिवासी विकास विभाग अतिरिक्त आयुक्त, नाशिक
  1. जी. सी. मंगले
सध्या : नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवी नियुक्ती : अहमदनगर महापालिकाचे आयुक्त
  1. व्ही. व्ही. माने
नवी नियुक्ती : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
  1. रवींद्र बिनवडे
सध्या : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर नवी नियुक्ती : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार