सोलापूर : सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पात मोठी दुर्घटना झाली आहे. बॉयलर अंगावर पडल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व मृत कामगार बिहारचे होते.
सोलापुरातील आहेरवाडीत एनटीपीसी प्रकल्प आहे. या प्रकल्पात क्रेनच्या सहाय्याने बॉयलरचे लोखंडी बीम बसवण्याचं काम सुरु होतं. मात्र बॉयलर पडल्याने चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा कर्मचारी गंभीर जखमी आहेत.
पोलिस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. त्यांच्या मदतीने बॉयलरखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अडकलेल्या कामगारांची संख्या मोठी असल्याचं कळतं.
दरम्यान, घटना नेमकी कधी घडली हे अजून स्पष्ट झालेलं नाही.