पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअरसह दोन जणांना अटक केली आहे. मात्र या इमारतीचा बिल्डर फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पुण्यात काल बालेवाडी परिसरात 'पार्क एक्सप्रेस' इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बिल्डर अरविंद जैन, श्रवण अग्रवाल यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचं बिल्डरतर्फे सांगण्यात आलं आहे.
या इमारतीला फक्त 11 मजले आणि पार्किंगची परवानगी देण्यात आली होती. मात्र 'पार्क एक्सप्रेस' या इमारतीचं बांधकाम चौदाव्या मजल्यापर्यंत करण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान चौदाव्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरु होतं. याचवेळी स्लॅबचा एक भाग कोसळून 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर चार कामगार जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या