सांगली : गुंगीचं औषध पाजून रेल्वेने प्रवास करणाऱ्या कुटुंबाला लुटल्याची घटना मिरज रेल्वे स्थानकावर घडली आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अधिक तपास मिरज रेल्वे पोलीस करत आहेत.

मूळचं राजस्थानचं असलेले शेवर आणि चौताराम कुटुंबिय म्हैसून एक्स्प्रेसने प्रवास करत होते. या प्रवासात सूरत रेल्वे स्थानक सोडल्यानंतर दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यासोबत जेवण केलं. यानंतर त्या इसमांनी शेवरी आणि चौताराम कुटुंबियांना फ्रूटीतून गुंगीचं औषध पाजलं.

सकाळच्या सुमारास या कुटुंबातील तुलसीराम चौताराम, नीमराम शेवर, फुली देवी चौताराम आणि शायरीदेवी शेवर कुटुंबिय मिरज स्थानकात बेशुद्ध अवस्थेतच सापडले. शिवाय त्यांच्याजवळचं सामानही हरवल्याचं समोर आलं आहे.

त्या चौघांनाही मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अधिक तपास मिरज रेल्वे पोलीस करत आहेत.