मुंबईः मुंबईच्या न्हावा शेवामध्ये कस्टम विभागाने कारवाई करत बेकायदेशीर चायनीज फटाके उद्धवस्त केले. कस्टम विभागाने बेकायदेशीररित्या आयात करण्यात येत असलेले 38 कोटी 32 लाख रुपये किंमतीचे चायनीज फटाके जप्त केले आहेत.


कर्कश आवाज आणि ध्वनी प्रदुषणामुळे चायनीज फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील समुद्रामार्गे चायनीज फटाके आयात केले जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.



दरम्यान कस्टम विभागाच्या सतर्कतेने बाजारात आयात होणारा चायनिज फटाक्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.