मुंबई : अग्निवीरमधून (Agniveer) 340 महिला (women) नौदलात ( Navy ) सहभागी होणार आहेत. या 340 महिला नौदलाच्या सर्व शाखांमध्ये काम करणार आहेत, अशी माहिती भारतीय नौदलाचे पश्चिम कमांडचे व्हाइस अडमिरल अजेंद्र बहादुर सिंह यांनी दिलीय.
नौदलात अग्निवीरांची पहिली टीम तयार करण्यात येत आहे. 10 लाख 82 हजार उमेदवारांनी यासाठी देशभरातून अर्ज केले होते. त्यातील सुमारे 3474 अग्निवीर नौदलात सहभागी झाले आहेत. त्यापैकी सुमारे 340 महिला नौदलात सहभागी होत आहेत. पुढच्या वर्षी आम्ही महिला अधिकाऱ्यांना सर्व शाखांमध्ये सहभागी करून घेणार आहोत. नौदलाच्या सर्व 29 शाखांमध्ये या महिला काम करतील. मेडिकल आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही तुकडी तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण किती जण यामध्ये सहभागी होतात त्याचे नंबर येतील, असे सिंह यांनी सांगितले.
अजेंद्र बहादुर सिंह यांनी कोस्टल सेक्युरिटीबाबतचीही माहिती दिली. "कोस्टल सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून अनेक मुद्यांवर आमही चर्चा करतोय. यामध्ये अनेक एजन्सी आहेत. चीफ सिक्रेटरी आणि आमच्यात एक बैठक देखील झाली आहे. को ओरडीनेशनची गरज असून त्यासाठी सहकार्य करत आहे. राज्य आणि आमची दोघांची जबाबदारी आहे. काही नव्या गाईडलाइन्स बनविल्या गेल्या असून कोस्टल सेक्युरिटीवर काम सुरू आहे, अशी माहिती सिंह यांनी दिलीय.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या तस्तरीत वाढ झालीय. याबाबत पोलताना सिंह म्हणाले, "नार्कोटिक्स ऑपरेशनसाठी सर्व एजन्सी एकत्रित रित्या काम करतात. ड्रग पकडण्यात आपल्याला यश मिळत आहे, ते देशात आपण येऊ देत नाही. अलीकडील काळात ड्रग्स तस्करीविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत."
सिंह म्हणाले, "भारताची 45 जहाजे शिपयार्डमध्ये तयार होत आहेत. यामध्ये खासगी आणि पब्लिक सेक्टर शिपयार्ड आहेत. मार्मा गोवा युद्धनौका 18 डिसेंबरला कमिशनिंग होणार आहे. प्रोजेक्ट 17 अल्फा 6 जहाज यामध्ये आहेत. हे जहाज माजगाव आणि कोलकत्तामध्ये बनत आहेत. शिवाय गोव्यात तलवार क्लासचे दोन जहाज तयार होत आहेत. तर दोन जहाजे देशाबाहेर बनत आहेत. तर उर्वरित 43 जहाजांचे बांधकाम भारतात बनत आहेत. तर दोन जहाजांचे काम रशियामध्ये सुरू आहे.
"विक्रांत युद्धनौकेबद्दल तुम्हला अभिमान वाटेल. ही 76 टक्के स्वदेशी जहाज असून आधुनिक आणि भारतातील मोठी युद्धनौका म्हणूज त्याकडे पाहिलं जाताय. आम्ही त्याचे ट्रायल सुरू केले असून नौसिक याबद्दल खूप प्रोत्साहित आहेत. विक्रांतचे 6 ते 8 महिने कारवार आणि गोवा येथे ट्रायल सुरू राहतील. मान्सून आधी हे ट्रायल आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, अशी माहिती सिंह यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या