कोल्हापूर : कोल्हापुरात दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाचा सेट जाळण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेत अज्ञातांनी काही वाहनांवर दगडफेकही केली.

भन्साळींच्या समर्थनार्थ सुशांतने 'राजपूत' आडनाव हटवलं

राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करणी सेनेने  संजय लिला भन्साळी यांना मारहाण केली होती. तसंच शूटिंग करण्यास मनाई केली होती. सिनेमात राणी पद्मावती यांची प्रतिमा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणी सेनेने केला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून कोल्हापूरच्या मसाई पठारावर 'पद्मावती' सिनेमाचं शूटिंग सुरु आहे.

जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण

पण, या चित्रपटामागचं शुक्लकाष्ट थेट पन्हाळगडाच्या पायथ्याशीही कायम असल्याचं या घटनेवरुन समोर आलं आहे. दरम्यान, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

भन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्द

पद्मावती सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. 17 नोव्हेंबर 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमात दीपिका राणी पद्मावती तर रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहेत.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?