नागपूर : भोसरी जमीन खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रत्यक्ष चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. निवृत्त न्यायाधीश डी एस झोटिंग यांच्या नेतृत्त्वातील समिती खडसेंची चौकशी करत आहे. महत्त्वाचं म्हणजे खडसेंना चौकशीसाठी नागपुरात जावं लागणार आहे.

 

कारण, माजी न्यायमूर्ती झोटिंग हे स्वत: नागपूरचे आहेत. त्यामुळे खडसेंना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात यावं लागेल.

 

खडसेंच्या चौकशीसाठी झोटिंग समितीला राज्य सरकारने रवी भवनातील एक कॉटेज कार्यालयासाठी दिलं आहे. इथंच खडसेंची चौकशी होईल.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

काय आहे भोसरी जमीन खरेदी प्रकरण?

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन मे महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. परंतु ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं आहे.

 

संबंधित बातम्या

 तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे

खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन

‘तो’ अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे

खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील

सबळ पुराव्यांशिवाय खडसेंवर बोलणार नाही, अण्णांची भूमिका

खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण

विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?

खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला

मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता

ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण

..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे

खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र