उस्मानाबादमध्ये सैनिक स्कूलमध्ये रॅगिंग, प्राचार्यांना कोठडी
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 04:59 AM (IST)
उस्मानाबाद : तुळजापूरमध्ये सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यावर झालेल्या रॅगिंगकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी प्राचार्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तुळजापूरच्या सैनिक शाळेत एका मुलावर रॅगिंगची घटना घडली होती. या घटनेची तक्रार प्राचार्यांकडे करण्यात आली होती. सैनिक शाळेतील पाच अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच वर्गातील एका मुलावर रॅगिंग केलं होतं. सैनिक शाळेच्या प्राचार्यांनी रॅगिंगच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तुळजापूरमधील ही सैनिक शाळा तुळजाभवानी ट्रस्टची आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.