पुन्हा वर्दीवर हात, नंदुरबारमध्ये पोलीस उपनिरीक्षकास मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2016 03:48 AM (IST)
नंदुरबार: कल्याणमधील पोलिसाला बुडवून जीवे मारण्याची घटना ताजी असताना, नंदुरबारमध्येही दोन गणेशोत्सव मंडळातील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उप निरिक्षकाला मारहाण झाली आहे. या प्रकरणी तीनजणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नंदुरबारमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती मुरवणुकीत दोन मंडळांमध्ये नाचण्याच्या कारणावरूव वाद झाले. हा वाद मिटवण्यासाठी गेलेले पोलीस उप निरीक्षक सखाराम भदाणे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. यात भदाणे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी नंदुरबार पोलिसांत तीन जणांवर गुन्हा दाखल झाले असून पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यामुळे ऐन सणांच्या काळात शांतता आणि सुवव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.