27th April Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मंगळवारी रत्नागिरीत रिफायनरी विरोधी आंदोलन पेटलं होतं. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. रिफायनरी विरोधक आणि प्रशासनामध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. तर, दुसरीकडे राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


राज्यभरात पावसाचा अंदाज -
  
आज विदर्भात बूऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक आणि पुण्यात गारपिटीचा इशारा. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांनाही गारपिटीचा हवामान खात्याचा इशारा. नांदेड, परभणी आणि हिंगोलीत जोरदार गारपिट होईल असा अंदाज व्यक्त केला असल्यामुळं फळबागांची काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे. 
 
रिफायनरी विरोधक आणि प्रशासनामध्ये आज बैठक -


रिफायनरी विरोधक आणि प्रशासनामध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. प्रशासन आणि विरोधक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आजच्या बैठकी बाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या बैठकीत काय होतय हे पहाणं महत्वं आहे.  


किसान सभेच्या मोर्च्याचा दुसरा दिवस -
शिर्डी – किसान सभेच्या मोर्च्याचा आजचा दुसरा दिवस आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणीतील कार्यालयावर विविधी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. वाढत्या उन्हाचा पारा पहाता पोलिसांनी मोर्चाला परवाणगी नाकारली आहे, मात्र मोर्चावर किसान मोर्चा ठाम आहे. काल संध्याकाळी 5 वाजता मोर्चाला सुरूवात झाली. मुक्कामानंतर आज पुन्हा एकदा हे शेतकऱ्यांच लाल वादळ सुरू होईल. सर्व काळजी घेत मोर्चेकरी आपल्या मागण्यांसाठी चालत आहेत. 


रुग्णालयाचे लोकार्पण, मोहन भागवत-एकनाथ शिंदे एकाच मंचावर
 
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या अद्ययावत रुग्णालयाचा लोकार्पण होणार सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. नागपूरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेला 470 बेडचा अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सुरुवातीला धरमपेठ परिसरात अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू झालेला हे रुग्णालय आता मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. धर्मादाय पद्धतीने चालणारा हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच नागपुरात दाखल होणार होते. मात्र काही कारणास्तव सकाळच्या वेळेत नागपुरात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट आज सकाळी मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये किंवा कार्यक्रम स्थळी होणार आहे. 
 
कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा -
कोल्हापूर – कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज खासदार बृजभूषण सिंह येणार आहेत. यांना विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील विविध संघटनांच्या महिला एकत्र येणार आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर खेळाडूंचा लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला कुस्तीच्या पंढरीत येऊ देणार नाही. अशी भूमिका विविध संघटनाने केला आहे.  


 
मुंबई – आयटी काद्यातील नवी दुरूस्ती व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत थेट मुलभूत अधिकारांवर गदा आणणारी असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होत आहे. हास्यकलाकार कुणाल कामराची याचिका हायकोर्टानं सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. एखाद्या राजकीय घडामोडीवर व्यंगात्मक टिपणी किंवा त्याचं प्रहसन सादर करण्यावरही या कायद्यानं आता कारवाई होई शकते. याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं आज यावर तातडीच्या दिलाश्याकरता सविस्तर सुनावणी होणार आहे. 
  
मुंबई – जिया खान प्रकरणी सीबीआय कोर्टाचा निर्णय येणार आहे.


  
वसई – वसईतील तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम समितीच्या वतीने आयोजित एका धार्मिक कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. 


पंजाब – प्रकाश सिंह बादल यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्ययात्रा चदीगड पासून सुरू होणार आहे. राजपूरा, पटियाला, संगरूर, बरनाला, रामपूरा, फूल आणि बठिंडा मार्गे त्यांच्या बादल गावात पोहचणार आहेत. 
 
 शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी 9 वाजता सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं. 1 मध्ये शाळापूर्व तयारी राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभाग सिंधुदुर्ग आणि जिल्हा महिला बालविकास विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन जिल्हयामध्ये करण्यात येणार आहे. शिवसेनेचा सावंतवाडी मधील मळगाव भगवती हॉल मध्ये आज मेळावा आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत होणार आहे,  


कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आज निवडणुकीच्या साहित्यांचे वाटप केले जाणार आहे.


महापालिका क्षेत्रात कोणत्या प्रकारचे किती वृक्ष आहे याची गणना आता होणार असून त्यासाठी महापालिकेने मुंबईतील एका कंपनीला एक वर्षाचा ठेका दिला आहे एक वर्षात वृक्षांची गणना पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी कंपनीचे 10 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यात वृक्षांना डिजिटल क्रमांक देण्यात येणार असून त्यांचे ठिकाण आणि त्या वृक्षांच्या वयाची मोबाईल ॲप मध्ये नोंद देखील होणार असून तब्बल 19 वर्षानंतर वृक्ष गणना करण्याची जाग महापालिकेला आली आहे.
 
 मुंबई – हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर आजपासून हायकोर्टात सुनावणी सुरू होईल. ईडीच्या प्रकरणात मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे.


हरिद्वार – राहुल गांधी यांच्या विरोधात संघाचे कार्यकर्ते कमल भदोरिया यांनी दाखल केलेल्या तक्रारी प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
 
उत्तराखंड – आजपासून चारधामच्या यात्रेला सुरूवात होणार आहे. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडतील.
 
कर्नाटक – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्च्युवल पद्धतीने बूथ कार्यकर्त्यांनी संबोधित करणार आहेत.  


कॉग्रेस नेते राहुल गांधी आज मेंगलुरू मध्ये रोड शो करणार आहेत.  


चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.