नाशिक : महिलांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्रास देणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला सायबर पोलिसांनी लातूरमधून अटक केली. या तरुणाने बनावट अकाऊंट तयार करून 658 महिलांना त्रास दिल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं.


विश्वाजित जोशी असं संशयिताचं नाव आहे. रात्री-अपरात्री महिलांना व्हिडीओ कॉल करून अश्लील मेसेज पाठवून तो त्रास देत होता.

काही दिवसांपूर्वी एक तरुणीने पोलिसात तक्रार दिली. एका मुलीच्या नावाच्या अकाऊंटवरुन अश्लील मेसेज येत होते. ते अकाऊंट ब्लॉक केले तरी दुसऱ्या मुलीचे नाव वापरुन पुन्हा तोच प्रकार सुरू झाला, अशी तक्रार करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असता विश्वजित जोशी या तरुणाने महिलांच्या नावाने 20 बनावट अकाउंट तयार करून 658 महिलांना त्रास दिल्याचं तपासात निष्पन्न झालं.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत त्याला अटक केली. विश्वजित जोशीला 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.